![]() |
Farmar11 |
नमस्कार मित्रांनो farmar11 मध्ये आपले स्वागत आहेत.
उज्वला गॅस योजना काय आहे कधी सुरू झाली या योजनेमध्ये कोण पात्र होऊ शकते जर तुम्हाला या योजनेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर तो तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकता त्याबाबतची संपूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये दिलेली आहे ब्लॉक संपूर्ण वाचा. यावर्षी 2023 मध्ये कोण या योजनेमध्ये पात्र झाले आहे त्यांची लिस्ट तुम्ही या ब्लॉगमध्ये चेक करू शकता त्याच बाबत कोणती कोणती कागदपत्रे लागतील कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता या योजनेची सुरुवात कधी झाली आणि यावर्षी म्हणजेच 2023 वर्षी शेवटची तारीख कोणती आहे त्याच्या आधी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकता याबद्दल पूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये दिलेली आहे.
![]() |
Farmar11 |
Ujjwala Gas Yojana Full Details
केंद्र सरकार आपली देशातील गरीब जनतेच्या हितासाठी विविध सरकारी योजना राबवित असते.त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव PM Ujjwala Yojana आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारच्या मते आपल्या देशातील बहुसंख्य लोक बहुसंख्य समाज जो गरीब आणि दारिद्र्य रेषेखाली आहे त्या सर्व कुटुंबांना या स्कीम द्वारे चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो. देशात बहुतांश कुटुंब हे दारिद्र रेषेखाली स्वतःचे जीवन जगत आहेत. त्या सर्व गरीब कुटुंबांचा आर्थिक बाजू कमजोर असल्यामुळे ते लोक चुलीवरचे जेवण बनवतात आणि चुलीवर जेवण बनवल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती लाकूडतोड करावी लागते मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे या लाकूडतोडेचा आपल्या वातावरणावरती म्हणजेच पर्यावरणावरती खूप विपरीत परिणाम होतो. याच्यामुळे कमी पाऊस पडणे आणि प्रदूषण सुद्धा होणे हा आहे जेव्हा एका घरामध्ये चुलीवर जेवण बनवले जाते तेव्हा त्या घरातील महिला या किचनमध्ये जास्त वेळ काम केल्यामुळे त्यांच्या आरोग्याला सुद्धा धोका निर्माण होत असतो त्यांना दम्यासारखा गंभीर आजार होण्याची शक्यता दाट असते आणि या सर्व गोष्टींना लक्षात घेऊन .
प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीं यांनी १ मे २०१६ रोजी Pradhanmantri Ujjwala Yojana संपूर्ण भारतात सुरु करण्याची घोषणा केली.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले की भारतातील जे कुटुंब गरीब आणि दारिद्र्यरेषेखाली असतील त्या कुटुंबांना त्या सर्व कुटुंबांना या योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडर दिले जातील. Ujjwala Gas Yojana या योजनेअंतर्गत दिला जाणारा गॅसचे वजन 14.2 किलो असून तो सिलेंडर अडचणीच्या ठिकाणी किंवा डोंगराळ भागांमध्ये किंवा दुर्गम भागामध्ये घेऊन जाणे शक्य नसल्यामुळे याच्यावरती शासनाने पर्याय असा काढला की पाच किलो वजनाचे दोन सिलेंडर उपलब्ध करून दिले आहेत जे घेऊन जाणे खूप सोपे आहे एक महिला सुद्धा त्या वजनाचा सिलेंडर घेऊन जाऊ शकते महिला सशक्तीकरणासाठी या पद्धतीच्या उपाययोजना सरकार करत असते आणि या योजनेची विशेष गोष्ट म्हणजे ही योजना फक्त महिलांच्या नावावर दिली जाते या योजनेसाठी केंद्र सरकारकडून १६००/ रुपये दिले जातात.
Ujjwala Gas Yojana या योजनेअंतर्गत सर्वात प्रथम ५ करोड कुटुंबांना या योजनेचा लाभ द्यायचा उद्देश होता त्याची संख्या वाढवून ८ करोड केली गेली. उज्वला गॅस योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी केली गेली आहे. या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्याला आपल्या जवळच्या गॅस वितरण केंद्रावर जाऊन या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन साठी अर्ज घ्यायचा आहे. उज्वला गॅस योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात नवीन नियमानुसार लाभार्थ्याला भरलेला सिलेंडर मोफत दिला जातो व शासनाकडून गॅस कनेक्शन साठी 800/- रुपये अनुदान दिले जाते. या योजनेचा फायदा खेडोपाड्यातील गरजू लोकांना होण्यासाठी भारत सरकार कार्यशील आहे आणि याबाबतची आपल्याला पूर्ण माहिती या आर्टिकल मध्ये बघायला मिळेल त्यामुळे हे आर्टिकल पूर्ण सविस्तर वाचा
Ujjwala Gas Yojana 2023 I नवीन अपडेट
नवीन शासन निर्णयानुसार 1 सप्टेंबर 2023 पासून उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर वर एकूण 400/- रुपयांची सब्सिडी दिली जाते आहे
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (पीएमयुवाय) लाभार्थ्यांना प्रति वर्ष 12 रिफिलसाठी प्रति 14.2 किलोच्या सिलिंडरसाठी 200 रुपये अनुदान द्यायला मान्यता दिली आहे. 1 मार्च 2023 पर्यंत या योजनेच्या 9.59 कोटी लाभार्थ्यांची नोंद झाली.
2022-23 या आर्थिक वर्षासाठी एकूण 6,100 कोटी रुपये आणि 2023-24 साठी 7,680 कोटी रुपये खर्च केले जातील. पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम थेट जमा केली जाते. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आओसीएल), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) या सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या 22 मे 2022 पासून हे अनुदान देत आहेत.
विविध भू-राजकीय कारणांमुळे एलपीजी (घरगुती वापरासाठीचा गॅस) च्या आंतरराष्ट्रीय किमतीत मोठी वाढ झाली आहे. एलपीजीच्या वाढलेल्या दरांपासून लाभार्थींचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे.
ग्राहकांना एलपीजीच्या दरात दिलासा दिला तर ते एलपीजीच्या सतत वापरासाठी प्रोत्साहित होतात. उज्ज्वला योजनेतल्या ग्राहकांनी पूर्णपणे स्वच्छ स्वयंपाक इंधनाकडे वळावे यासाठी त्यांनी सतत एलपीजीचा अवलंब आणि वापर करणे महत्त्वाचे आहे योजनेतील ग्राहकांचा एलपीजीचा सरासरी वापर 2019-20 मधील 3.01 रिफिलवरून 20 टक्क्यांनी वाढून 2021-22 मध्ये 3.68 झाला आहे. सर्व लाभार्थी या अनुदानासाठी पात्र आहेत. ग्रामीण आणि वंचित गरीब कुटुंबांना लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी), स्वच्छ स्वयंपाक इंधन उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने मे 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. गरीब घरातील प्रौढ महिलांना डिपॉझिट न ठेवता मोफत एलपीजी जोडणी या योजनेअंतर्गत दिली जाते.
योजनेचे नाव
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना महाराष्ट् Ujjwala Gas Yojana
योजना कोणी सुरु केली
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी
योजनेची सुरुवात
01 मे 2016
विभाग
ग्रामीण विकास विभाग
योजनेचे लाभार्थी
ग्रामीण भागातील गरीब गरजू आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंब
लाभ
मोफत गॅस कनेक्शन
योजनेचे उद्दिष्ट्य
योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडर देणे
अर्ज करण्याची पद्धत
ऑनलाईन / ऑफलाईन
महत्वाची अपडेट
येथे क्लिक करा
महाराष्ट्र उज्वला गॅस योजनेचे उद्दिष्ट
प्रधानमंत्री Ujjwala Gas Yojana योजनेचा मुख्य उद्देश (PMUY) हा आहे की देशातील सर्व गरीब दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना गॅस कलेक्शन उपलब्ध करून देणे.
ग्रामीण भागातील बहुतांश महिला या चुलीवरती जेवण बनवतात चुलीवर ती जेवण बनवल्यामुळे वायू प्रदूषण होते आणि त्यामुळे त्या घरातील महिलांना दम्यासारखे गंभीर आजार होतात चुलीवर जेवण बनवल्यामुळे मोठ्या प्रमाणात लाकूडतोड केली जाते याचा विपरीत परिणाम आपल्या निसर्गावरती होतो .हा देखील एक उद्देश आहे
राज्यातील व्यक्तीचे जीवनमान सुधारणे
राज्यातील व्यक्तीचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे
राज्यातील व्यक्तींना आत्मनिर्भर बनविणे
Ujjwala Gas Yojana eligibility
प्रधानमंत्री उज्वला योजनेचे वैशिष्ट्ये
श्री नरेंद्र मोदी यांनी Ujjwala Gas Yojana एक मे 2016 रोजी या योजनेची सुरुवात केली.
Ujjwala Gas Yojana या योजनेची सुरुवात झाल्यानंतर सर्वप्रथम पाच करोड कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्याची शक्यता वर्तवली गेली होती परंतु या योजनेचा लाभ जवळपास आठ करोड कुटुंबांना झाला
Ujjwala Gas Yojana या योजनेअंतर्गत भारतातील गरीब गरजावंत आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना या योजनेचा फायदा व्हावा.
Ujjwala Gas Yojana ही योजना सुरू केल्यापासून मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड आटोक्यात आल्याचे दिसून आले.
ग्रामीण भागातील महिलांना ही योजना येण्यापूर्वी होणारा दम्याचा त्रास आटोक्यात आल्याचे दिसून आले.
Ujjwala Gas Yojana ही योजना सुरू करण्याआधी वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत होते ते आटोक्यात आलेली दिसून आले.
भारतातील अत्यंत दुर्मिळ भागांमध्ये डोंगरदऱ्यांमध्ये सुद्धा या योजनेद्वारे फायदा घेतला गेला आहे.
ही योजना महिला सशक्तिकरणासाठी उपयुक्त आहे त्याच कारणामुळे या योजनेचा रजिस्ट्रेशन फक्त महिलेच्या नावावर केले गेले आहे.
Ujjwala Gas Yojana या योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर स्वस्त मिळत असल्याने गॅस सिलेंडरचा वापर वाढला व वृक्षतोड कमी प्रमाणात केल्याचे दिसून आले.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी करण्यात आली आहे.
अर्जदार आपल्या जवळच्या गॅस वितरण केंद्रात जाऊन अर्ज करू शकतो.
Ujjwala Gas Yojana eligibility
प्रधानमंत्री उज्वला योजनेचे वैशिष्ट्ये
श्री नरेंद्र मोदी यांनी Ujjwala Gas Yojana एक मे 2016 रोजी या योजनेची सुरुवात केली.
Ujjwala Gas Yojana या योजनेची सुरुवात झाल्यानंतर सर्वप्रथम पाच करोड कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्याची शक्यता वर्तवली गेली होती परंतु या योजनेचा लाभ जवळपास आठ करोड कुटुंबांना झाला
Ujjwala Gas Yojana या योजनेअंतर्गत भारतातील गरीब गरजावंत आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना या योजनेचा फायदा व्हावा.
Ujjwala Gas Yojana ही योजना सुरू केल्यापासून मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड आटोक्यात आल्याचे दिसून आले.
ग्रामीण भागातील महिलांना ही योजना येण्यापूर्वी होणारा दम्याचा त्रास आटोक्यात आल्याचे दिसून आले.
Ujjwala Gas Yojana ही योजना सुरू करण्याआधी वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत होते ते आटोक्यात आलेली दिसून आले.
भारतातील अत्यंत दुर्मिळ भागांमध्ये डोंगरदऱ्यांमध्ये सुद्धा या योजनेद्वारे फायदा घेतला गेला आहे.
ही योजना महिला सशक्तिकरणासाठी उपयुक्त आहे त्याच कारणामुळे या योजनेचा रजिस्ट्रेशन फक्त महिलेच्या नावावर केले गेले आहे.
Ujjwala Gas Yojana या योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर स्वस्त मिळत असल्याने गॅस सिलेंडरचा वापर वाढला व वृक्षतोड कमी प्रमाणात केल्याचे दिसून आले.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी करण्यात आली आहे.
अर्जदार आपल्या जवळच्या गॅस वितरण केंद्रात जाऊन अर्ज करू शकतो.
प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ
Ujjwala Gas Yojana या योजनेअंतर्गत भारतातील गरीब गरजू आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोठ्या प्रमाणावर लाभ झाला.
ज्या महिला चुलीवर स्वयंपाक बनवत होता त्या महिलांना मोठ्या प्रमाणावर दम्याचा त्रास होत होता त्यांना दम्यापासून आराम मिळाला आणि स्वयंपाक लवकर होऊ लागला
वृक्षतोड थांबण्याचे दिसून आले त्याच्यामुळे आपल्या निसर्गाला आणि आपल्या सर्वांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला.
चुलीवर जेवण बनवल्यामुळे घरातील लहान मुलांना त्या धुराचा खूप त्रास होत असतो त्या त्रासापासून या योजनेमार्फत आराम मिळालेला दिसून आला. Ujjwala Gas Yojana
Ujjwala Gas Yojana योजनेअंतर्गत मिळणारे फायदे
प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत कनेक्शनसाठी भारत सरकारद्वारे रोख मदत करण्यात येते.
१४.२ किलो सिलेंडरसाठी १६०० /- रुपये व ५ किलो सिलेंडरसाठी ११५०/- रुपये
यात खालील बाबींचा समावेश आहे Ujjwala Gas Yojana
सिलेंडरसाठी सुरक्षा ठेव: १४.२ किलो सिलेंडरसाठी १२५०/- रुपये व ५ किलो सिलेंडरसाठी ८००/- रुपये
प्रेशर रेग्युलेटर – १५०/- रुपये
एलपीजी नळी – १००/- रुपये
घरगुती गॅस ग्राहक कार्ड – २५/- रुपये
तपासणी / मांडणी / प्रात्यक्षिक शुल्क – ७५/- रुपये
याव्यतिरिक्त, सर्व प्रधानमंत्री उज्वला योजनेच्यालाभार्थ्यांना त्यांच्या ठेवी मुक्त कनेक्शन बरोबर तेल विपणन कंपन्यां (ओएमसी) तर्फे पहिले एलपीजी रीफिल आणि स्टोव्ह (हॉटप्लेट) दोन्ही विनामूल्य प्रदान केले जातील.
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचे लाभार्थी
दारिद्र्य रेषेखालील कुटुंब
सेक्शन 11 च्या अंतर्गत लाभार्थी यादीमधील महिला.
वनक्षेत्रात राहणारे कुटुंब
अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / बौद्ध / मागासवर्गीय आणि गरीब कुटुंब
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी
अति मागासवर्गीय (एमबीसी)
अंत्योदय अन्न योजना (एएवाय)
चहा आणि माजी चहा बाग जमाती
वनवासी
बेटे आणि नदी बेटांचे रहिवासी
एसइसीसी कुटुंबांतर्गत (एएचएल टिन) किंवा १४-कलमी घोषणेनुसार कोणत्याही गरीब कुटुंबांतर्गत नोंदणी केलेले
देशातील दुर्गम भाग जिथे लोकांना जेवण बनवण्यासाठी गॅस कनेक्शन उपलब्ध नाही आणि त्यामुळे त्यांना चुलीवर जेवण बनवावे लागते अशा महिलांना या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आहे.
प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता /अटी
अर्जदाराचे नाव 2018 च्या जनगणनेच्या यादीत असणे अनिवार्य आहे.
प्रधानमंत्री आवास योजना आणि अंत्योदय योजना चे लाभार्थी या प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ घेऊ शकतात.
BPL वर्गातील कुटुंब, वनक्षेत्रात राहणारे कुटुंब, मागासवर्गीय, SC, ST, दारिद्र रेषेखालील कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
कुटुंबातील फक्त महिला सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकते.
या योजनेअंतर्गत अर्जदार महिलेचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
त्याच घरातील कोणासही ओएमसी कडून कोणतेही एलपीजी कनेक्शन मिळालेले नसावे.
रेशन कार्डधारकांना या योजनेअंतर्गत पात्र मानले जाईल परंतु त्यांना फक्त एकच गॅस दिले जाईल.
अर्जदाराच्या नावावर ह्या आधी कधी गॅस कनेक्शन घेतले गेलेले नसावे किंवा एकाच घरात इतर कोणतेही एलपीजी कनेक्शन असू नये.
अर्जदाराच्या कुटुंबात इतर कोणत्या सदस्याच्या नावे गॅस कनेक्शन घेतले गेलेले असता कामा नये.
प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत
तुम्हाला तुमच्या जवळच्या गॅस वितरक ऑफिसमध्ये जाऊन याबाबतची संपूर्ण माहिती घेऊन त्या ठिकाणी ऑफलाइन अर्ज सादर करावा लागेल त्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे वरती आर्टिकल मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही सादर करून या योजनेचा लाभ घेऊ शकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे नाव 2018 च्या जनगणनेच्या यादीत असणे आवश्यक आहे. एका कुटुंबातील फक्त एक महिला सदस्य या योजनेचा फायदा घेऊ शकते याबाबतची संपूर्ण माहिती वर डिटेलमध्ये दिलेली आहे.
प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली अधिकृत वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करा परंतु त्याच्या आधी ऑनलाईन अर्ज करण्याची पूर्ण पद्धत वाचून घ्या.
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही