![]() |
Farmar11 |
एलनिनो आला…! आता सप्टेंबर महिन्यात काय होणार ? पाऊस पडणार की कोरडाच जाणार, हवामान तज्ञांनी एका शब्दातच सांगितलं
![]() |
Farmar11 |
जुलै महिन्यात विदर्भ, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रसह उत्तर महाराष्ट्रात सर्वदूर चांगला पाऊस झाल्यानंतर पावसाने ऑगस्ट महिन्यात मोठी विश्रांती घेतली आहे. ऑगस्ट महिना येत्या काही दिवसात संपणार आहे.
एकीकडे महिन्याचा सेंड ऑफ होणार आहे, म्हणजे मान्सून संपण्याच्याच मार्गावर आहे तर दुसरीकडे महिन्याच्या सुरुवातीपासून गायब झालेला पाऊस महिना अखेरला पण बरसणार नसल्याचे सांगितले जात आहे. या चालू महिन्यात महाराष्ट्रात कुठेच दमदार पाऊस होणार नसल्याचे सांगितले जात आहे.
![]() |
Farmar11 |
सोयाबीन, कापूस, तूर, मका यांसारखी पिके पावसाच्या ओढीमुळे करपू लागली आहेत. अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर पावसाविना जळून खाक होऊ लागले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा जीव तुटतं आहे. म्हणून शेतकरी आता आतुरतेने मोठ्या पावसाची वाट पाहत आहेत.
पिकांना आता मोठ्या पावसाची नितांत आवश्यकता आहे. आता जर चांगला मोठा पाऊस पडला तर खरीप हंगामातील पिकांना नवीन संजीवनी मिळेल आणि पिके पुन्हा उभारी घेतील, विक्रमी नाही पण बऱ्यापैकी उत्पादन मिळेल आणि केलेला खर्च तरी भरून निघेल असे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.
यामुळे सध्या शेतकऱ्यांची आभाळाकडे नजर आहे. अशातच वरूणराजाने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा सांगावा धाडला आहे. वरूणराजा आता महाराष्ट्रावर कृपादृष्टी दाखवणार असा अंदाज आहे. आता राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस सक्रिय होणार असे चित्र आहे.
.......मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राने उद्या राज्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे उद्या मराठवाड्यातील लातूर, उसमानाबाद, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, जालना, बीड, व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
विशेष म्हणजे उद्या मराठवाड्यात जोराचे वारे वाहतील असा देखील अंदाज आहे. मराठवाड्यात उद्या तास 30 ते 40 किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याचे शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मराठवाड्यात उद्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार अस सांगितल जात आहे. निश्चितच हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून खरीप हंगामातील पिकांना पुन्हा एकदा जीवदान मिळेल अशी
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही