सोयाबीन  बाजार  उचांक गाठणार तज्ञाचा अंदाज

सोयाबीन  मार्केट
सोयाबीन मार्केट
 नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीमाल बाजारातील काही मालाच्या भावातील चढ-उतार जास्त आहे. याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक असते. तर शेत  शेतीमाल बाजारातील महत्त्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये चढ-उतार सुरूच होते. दुपारपर्यंत सोयाबीनचे फायदे वाढवून 11.96 प्रतिभांच्या दरम्यान पोहोचले होते.

 

 * देशातील बाजारातील परिस्थिती काय*

 तर देशातील बाजारातील परिस्थिती कायम आहे देशातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून सोयाबीनचे भाव चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान पोहोचले आहेत. सोयाबीन बाजारातील स्थिती पाहता सोयाबीन दरातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते. असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.. कापसाच्या वायद्यांमध्ये पुन्हा सुधारणा दिसून आली. आज दुपारपर्यंत पाचशे रुपयांनी वाढून 62 हजार पाचशे रुपयांपर्यंत पोहोचले होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे 92.21 प्रतिपादन वर होते.

 देशातील बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार तीनशे ते सात हजार सातशे रुपयांचा भाव मिळाला. अनेक बाजारामध्ये कापसाच्या भावात सुधारणा झाली होती कापसाच्या भावात आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे. असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. कांद्याच्या भावातील चढूतार सुरूच आहे. सरकारने पाच लाख टन कांदा खरेदीचा निर्णय घेतला तरी त्याचा फायदा कांदा बाजाराला होताना दिसत नाही.

 आज देशातील बहुतांश बाजारांमध्ये कांद्याच्या ही लिलाव बंद होते .त्यामुळे उलाढाल बंद होती पण काही मोठ्या शहरांमधील बाजार सुरू होते तर कांद्याचा भाव कालच्या तुलने जवळपास तीनशे ते चारशे रुपयांनी कमी होता. आज कांद्याचे व्यवहार 1000 ते 1200 रुपयांनी पार पडली  आहेत .

बाजारातील आवक कमी असल्याने मिरचीला सध्या चांगला भाव मिळत आहे सध्या कमी दिसत असली तरी उठाव मात्र चांगला आहे. लग्नसराई आणि सणामुळे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे. सध्या हिरव्या मिरचीला चार हजार पाचशे ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

 

 

 



 

 तसेच वाढत्या उन्हामुळे मिरची पिकाला फटका बसत आहे त्यामुळे पुढच्या काळात मिरचीची आवक कमी होत जाईल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहे लसणाचे भाव मागील काही दिवसांपासून कमी झाले आहेत तर बाजारातील आवक वाढत आहे मागील काही आठवड्यांपासून लसणाचे भाव क्विंटल मागे २० ते ३० टक्क्यांनी कमी आले आहेत किरकोळ बाजारातील लसूण नरमला आहे सध्या बाजारात लसणाला प्रति क्विंटल सरासरी 9000 ते 10 हजार रुपये प्रतिक्विंटनला भाव मिळत आहे . पुढील काळातही काहीसे चढ-उतार राहतील असा अंदाज नसून व्यापारी व्यक्त करत आहेत हा प्रकार आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा .

धन्यवाद ,

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा