![]() |
Farmar11 |
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी येत आहे.राज्यातील तब्बल ३५ लाख शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात २५% अग्रीम पिक विम्यासाठी १७०० कोटींचा निधी वितरीत करण्यात आला असून आता जिल्ह्यानुसार कोणत्या जिल्ह्याला किती निधी वितरीत करण्यात आला आहे याबाबत माहिती मिळत आहे त्यानुसार यादी देखील पाहता येणार आहे.
शेतकऱ्यांना दिवाळी साठी आर्थिक मदत देण्यासाठी. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले नुसार २५% अग्रीम पिक विमा सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळी च्या आधी जमा करण्यात येणार आहे.यानुसार आता राज्य सरकरने आणि विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यासाठी १७०० कोटींचा निधी वितरीत केला असून ३५ लाख ०८ हजार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी मार्फत थेट जमा केले जाणार आहेत.
राज्य सरकारने यावर्षी फक्त १ रु.मध्ये पिक विमा योजना सुरु केल्याने राज्यातील तब्बल १ कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी आपला पिक विमा भरला होता.यावर्षी ज्या मंडळात सलग २१ दिवस पाऊस पडला नाही अश्या सर्व मंडळांना पीकविमा लाभ देण्यात येणार आहेत .
राज्यातील शेतकर्याचे खूप मोठ्या परमाणात नुसकान झाले आहेत .याच अनुषगाने दुष्काळ यादी मध्ये अनेक नवीन जिल्हे सामील केले आहेत .खालील प्रमाने यादी दिलेली आहेत .
अ.क्र. | जिल्ह्याचे नाव | लाभार्थी संख्या | मिळणारी रक्कम (कोटीमध्ये) |
---|---|---|---|
1 | बीड | 770574 | 241.21 |
2 | धाराशिव | 498720 | 218.85 |
3 | परभणी | 441970 | 206.11 |
4 | जालना | 370625 | 160.48 |
5 | नाशिक | 350000 | 155.74 |
6 | अहमदनगर | 231831 | 160.28 |
7 | लातूर | 219535 | 244.87 |
8 | सोलापूर | 182534 | 111.41 |
9 | अकोला | 177253 | 97.29 |
10 | सांगली | 98372 | 2.04 |
11 | नागपूर | 63422 | 52.21 |
12 | सातारा | 40406 | 6.74 |
13 | बुलढाणा | 23558 | 18.39 |
14 | जळगाव | 16921 | 4.88 |
15 | अमरावती | 10265 | 8 लाख रुपये |
16 | कोल्हापूर | 228 | 13 लाखरुपये |
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही