कापूसचे आजचे भाव
![]() |
Farmar11 |
नमस्कार मित्रांनो farmar11 मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजचे बाजार भाव आता सध्या बऱ्याच ठिकाणी आठवडे बाजारामध्ये कापूस येत आहेत तरी शेतकऱ्याला एक चिंता लागून गेली आहे यावर्षी कापसाचे उत्पादन दरवर्षीपेक्षा कमी प्रमाणात झाल्या आहेत तरी यावर्षी कापूस कोणत्या भावात विक्री होईल.
![]() |
Farmar11 |
महाराष्ट्रातील संभाजीनगर जवळ असलेले या पैठण तालुक्यातील पाचोड येथील आठवडी बाजारात नवीन कापूस विक्रीला येण्यास सुरुवात झाली आहे. कापसाला ७ हजार १०० रुपये एवढा भाव मिळाला.
पाचोडसह परिसरात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत पावसाने दडी मारल्याने त्याचा परिणाम खरीप पिकांवर झाला. फटका बसला तरी शेतकऱ्यांनी आटापिटा करून कपाशी जगविली. सध्या परिसरात अनेक ठिकाणी कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. रविवारी काही शेतकऱ्यांनी वेचलेला नवीन कापूस बाजारात विक्रीसाठी आणला होता. या कापसाला खाजगी व्यापाऱ्यांनी ७ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव दिला. कापसाच्या दरात आणखी वाढ व्हावी, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. सध्या थोडा थोडा कापूस शेतकरी विक्रीसाठी आणत असल्याचे व्यापारी संजयकुमार सेठी यांनी सांगितले.
![]() |
Farmar11 |
एक एकर कपाशीचे पीक घ्यायचे म्हटले तर साधारणपणे ४० ते ४५ हजारांच्या आसपास खर्च आला आहे. दुसऱ्या बाजूला समाधानकारक भाव नसल्याने तसेच कापसाची चोरी सुरु असल्याने कापूस पिकावर केलेला खर्च फिटणे देखील अवघड आहे.- सुनील येवले,कापूस उत्पादक शेतकरी
शेतकऱ्यांना कापूस उत्पादनासाठी किती खर्च येतो?
- नांगरट २४००
- रोटा २२००
- बियाणे १६००
- दोन बॅगामजुरी ८००
लागवड)खते
- १० हजारखुरपणी
- १० हजारफवारणी
- कापूस वेचणी १० हजार
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही