तहानलेल्या- महाराष्ट्राला -मिळणार- दिलासा - राज्यातील ‘या’ भागात पडणार- पाऊस-हवामान- विभागाचा -अंदाज

 

Farmar11 

तहानलेल्या -महाराष्ट्राला मिळणार -दिलासा ! राज्यातील -‘या’ -भागात पडणार -पाऊस, -हवामान विभागाचा -अंदाज



महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे.


 राज्यातील काही भागात सध्या हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे. 


मात्र राज्यातील बहुतांशी भागात अजूनही पाऊस सुरू झालेला नाही. 

Farmar11



यामुळे ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या खंडाचा कालावधी वाढला आहे. 


परिणामी खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहे.

अनेक भागातील पिके करपून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या राज्यावर पाणी संकट ओढावले आहे.


 दरम्यान राज्यातील काही भागाला दिलासा मिळणार असे चित्र तयार होत आहे.

Farmar11

Farmar11 


 तहानलेल्या महाराष्ट्रातील काही भागात भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून हलका ते मध्यम पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

"हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा आता हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला आहे. तसेच दक्षिण अंतर्गत कर्नाटक पासून कोमोरीन भागापर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत आहे"

या बरोबरच उत्तर केरळ आणि लक्षद्वीप परिसरावर चक्राकार वारे वाहत असल्याची माहिती हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. 


या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील काही भागात हलका ते मध्यम पावसासाठी पोषक हवामान तयार होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.


 आज मंगळवार 29 ऑगस्ट रोजी राज्यातील कोकणातील दक्षिण भागात हलका ते मध्यम पाऊस पडणार असा अंदाज आहे.

दक्षिण कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची शक्यता असून या दोन्ही जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस पडणार असे देखील हवामान विभागाने यावेळी नमूद केले आहे. 


याशिवाय आज मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजाच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मात्र उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलका पाऊस पडणार असे हवामान विभागाने आपल्या अंदाजात स्पष्ट केले आहे. 

एकंदरीत राज्यातील काही भागात आज पाऊस पडणार असल्याने संबंधित भागातील शेती पिकांना यामुळे दिलासा मिळणार असे सांगितले जात आहे.




अधिक माहीती साठी येथे क्लिक करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या