8 ते 28 -सप्टेंबर -दरम्यान सरासरीपेक्षा- जास्त पाऊस -पडणार -हवामान - अंदाज

 

Farmar11
Farmar11


8 ते 28 सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार ; हवामान खात्याचा अंदाज

           
Farmar11




8 ते 28 सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार ; हवामान खात्याचा अंदाज 

     
यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झालं आहे. 

महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण खूपच कमी असल्यामुळे खरीप हंगाम वाया गेल्यातच जमा आहे. 

अशातच पाऊस पडण्याऐवजी जोराचा वारा, 
कधी ऊन तर कधी पावसाच्या किरकोळ आणि अत्यंत हलक्या स्वरुपाच्या सरी पडत आहेत. 
मात्र या नैराश्याच्या वातावरणात एक आशेचा किरण दिसत आहे. 

पुढच्या महिन्यात अर्थात 8 ते 28 सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.
Farmar11
Farmar11 

सर्वसाधारणपणे जून ते सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत दरवर्षी पावसाळा ऋतू येतो. 

यावर्षी जून संपला, जूलै संपला, ऑगस्टदेखील संपत आहे संपत आला आहे. 

मात्र तरीदेखील पावसाचा पत्ता नाही. एकीकडे घाटमाथाच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला. 

"काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. 
परंतु काही ठिकाणी अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. "

अशा परिस्थितीत पिकांची खूपच हानी होत आहे. त्यामुळे बळीराजाच्या नजरा आभाळाकडे वळल्या आहेत.
Farmar11 











पावसाचे पाणी हे जमिनीतल्या पिकांसाठी अमृतासमान असतं. 

पाऊस पडला नाही तर या पिकांचं काय ? विहिरी तसंच बोअरमधल्या पाण्याची पातळीतदेखील मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. 

धरणातही पाणीसाठा जेमतेम शिल्लक राहिलेला आहे. 

त्यामुळे वर्षभर शेतीला आणि पिण्याच्या पाण्याला वणवण करावी लागणार आहे की काय, 

अशी शंका शेतकऱ्यांसह सर्वच ठिकाणी व्यक्त केली जात आहे

गेल्या महिन्यात शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस, तुर पिकासाठी खत दिले.

 काहींनी महागड्या औषधांची फवारणी केली. 

नाशिक जिल्ह्यातल्या काही भागांत मका पिकावर लष्करी अळीचा प्रादूर्भाव पाहायला मिळाला होता. 

या अळीवर नियंत्रणासाठी अनेकांनी महागड्या औषधांची फवारणी केली आहे





मात्र आता खरीप हंगामासाठी लाखो रुपयांचा खर्च करून झाल्यावर पावसाने विश्रांती घेतली आहे. ऑगस्ट महिन्यात राज्यातील कोणत्याच जिल्ह्यात, कोणत्याच गावात मुसळधार पाऊस झाला नाही. यामुळे खरिपातील खत दिलेली पिके आता माना टिकायला लागली आहेत..........







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या