Dairy- Farmer -: दूध -व्यवसाय शेतकऱ्यांसाठी- ठरतोय -आतबट्ट्याचाच !


Dairy Farmer : दूध व्यवसाय शेतकऱ्यांसाठी ठरतोय आतबट्ट्याचाच !

Farmar 11
Farmar 11









Pune News : राज्यातील शेतकऱ्यांना दूध व्यवसाय आतबट्ट्याचा कसा ठरतोय, जाहीर खरेदी दराच्या तुलनेत गायीच्या दुधात ८ रुपये आणि म्हशीच्या दुधात १९ रुपये सरासरी उत्पादन खर्चापेक्षा कमी दर कसा मिळत आहे, याचा पोलखोल खुद्द शासनाच्या माहितीनेच केला आहे.

शासनाकडूनच प्राप्त माहितीतून, नफातर कोसो दूरच, उत्पादन खर्चही निघू न शकणाऱ्या राज्यातील खरेदी दरातून दूध उत्पादक शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक पुन्हा एकदा समोर आली आहे.







फोरम ऑफ इंटलेक्च्युअल्स (पुणे) संस्थेचे अध्यक्ष सतीश देशमुख यांनी प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी कार्यालयाकडून मागविलेल्या माहितीतून हे सत्य समोर आले आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, बीड, जालना, परभणी, उस्मानाबाद, नांदेड या सात जिल्ह्यांमधील दूध उत्पादन खर्चाची ही धक्कादायक माहिती असून दूध खरेदी दराचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

यातील प्रत्येक जिल्ह्यातील दूध उत्पादन खर्चात फरक असला, तरी या सात जिल्ह्यांचा मिळून गायीच्या दुधाचा ४२.३३, तर म्हशीच्या दुधाचा ६८.२६ रुपये प्रति लिटर सरासरी खर्च समोर आला आहे. शासनाकडून जाहीर खरेदी दराच्या तुलनेतच गायीच्या दुधात ४ ते १२ रुपये आणि म्हशीच्या दुधात १३ ते २९ रुपये या जिल्ह्यांतील स्पष्ट फरक दिसून येत आहे.
Farmar 11


राज्य सरकारकडून गायीच्या दुधाला १४ जुलै २०२३ रुपये प्रति लिटर ३४ रुपये (३.५/८.५ गुणप्रत) दर जाहीर झाला आहे. 

तर म्हशीच्या दुधात जून २०१७ च्या ३६ रुपये प्रति लिटर (६.०/९.० गुणप्रत) दरानंतर आजपर्यंत खरेदीदराची घोषणाच झालेली नाही.

सध्या म्हशीला ४९.५० रुपये प्रति लिटर दर हा सहकारी दूध संघांकडून दिला जातो. 

मात्र, शासनाकडून दूध खरेदी दर ठरविण्याची पद्धतच बंद झाल्याचे आणि या करिता स्थापन समिती बासनात गुंडाळण्याचेच समोर आले आहे.

याबाबत बोलताना श्री. देशमुख म्हणाले,‘‘यापूर्वी राज्य सरकारने दुधाला ‘एफआरपी’चे कायदेशीर संरक्षण (किमान रास्त व किफायतशीर दर-उसाच्या धर्तीवर) देण्याचे आश्वासन दिले होते.


 त्याचा सर्वांना विसर पडला आहे. नुसत्या समित्या नेमण्याचे नाटक चालू आहे.

त्यावरही लुटारूंचीच वर्णी लावली जाते, मग न्याय कसा मिळणार? याचा प्राधान्याने विचार झाला नाही तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील, भेसळीचे प्रमाण वाढेल, देशातील पशुधन कमी होईल, त्यामुळे जमिनीच्या आरोग्यावर, अन्नधान्य पोषणमूल्य व पर्यायाने माणसाच्या आरोग्यावर विपरीत दूरगामी परिणाम होतील; नाही झालेतच.’’

दूध उत्पादन सरासरी खर्च आणि दर (रुपये/प्रति लिटर)

प्रकार ---------- सरासरी उत्पादन खर्च ----------- खरेदी दर ------------- तफावत

गाय ----------- ४२.३३ ----------------------- ३४ ---------------- ८.३३ रु.

म्हैस ----------- ६८.२६ ---------------------- ४९.५०* ------------ १८.७६ रु.

*सहकारी दूध संघाकडून जाहीर सरासरी दर

जिल्हानिहाय गाय व म्हैस दूध उत्पादन खर्च (रुपये/प्रति लिटर)

विभाग गाईचे दूध म्हशीचे दूध

औरंगाबाद ४०.८० ६५.४२

लातूर ४४.९० ६२.६१

परभणी ३७.८५ ६४.२७

बीड ४१.०६ ६२.२६

जालना ४३.७५ ७१.३०

उस्मानाबाद ४५.९७ ७८.९२

नांदेड ४१.९८ ७३.०८

सरासरी ४२.३३ ६८.२६





दूध उत्पादन खर्चाबाबत संस्थेने उपस्थित केलेले मुद्दे...

१) शासकीय माहितीत वैरण, चारा, पशुखाद्य, मजुरीचे दर, पशुवैद्य, कृत्रिम रेतन, औषध, विमा वगेरैंचे वाढलेले भाव पकडलेले दिसत नाहीत.

२) या माहितीत जनावरांची संख्या १० पकडलेली आहे. पण अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे तीन ते पाच जनावरे असतात. त्यामुळे खर्च अजून वाढणार.

३) कालवड व गोऱ्हे यांचा पाच वर्षापर्यंतचा संगोपन खर्च पकडलेला नाही.

४) अनुत्पादक भाकड गाय व बैलांचा दहा वर्षे सांभाळण्याचा खर्च गृहीत धरलेला नाही.

५) गाभण गाय व म्हैस शेवटच्या काही महिन्यात हळूहळू कमी दूध देते, ते गृहीत धरलेले नाही.

Farmar 11 





वेगवेगळ्या विभागाच्या गृहीत धरलेल्या आकडेवारी मध्ये फार जास्त तफावत आहे. उदाहरणात कोणी शेण खत विक्रीचा भाव ५००० रु. प्रति गाडी धरला आहे तर कोणी १५०० रु. गृहीत धरला आहे. त्यामुळे दुधाच्या उत्पन्न खर्चामध्ये, गाई साठी १० रु. तर म्हशीच्या दूध उत्पादन खर्चामध्ये २२ रु. फरक येऊ शकतो.


अनुदानाची माहिती नाही


‘राज्य शासनाने खासगी, सहकारी व सरकारी दूध संघांना किती अनुदान दिले याची माहिती मागविली होती. 


अनुदानाची रक्कम दूध संघांच्याच घशात जाते, ती शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहचत नाही असा अनुभव आहे, ती माहिती उपलब्ध नाही असे उत्तर मिळाले आहे,’ असे श्री. देशमुख म्हणाले.


‘‘शेतकऱ्यांना दूध उत्पादन खर्च अधिक १५ टक्के नफा देऊन भाव देण्यात यावा अशी आमची मागणी आहे. "


शेतकरी फक्त जगलाच नाही तर तो समृद्ध ही झाला पाहिजे.कारण हे शेतकऱ्यांना दैनंदिन आर्थिक गरज पुरवण्याचे साधन आहे.

- सतीश देशमुख, अध्यक्ष, फोरम ऑफ इंटलेक्च्युअल्स, पुणे




अधिक माहीती साठी येथे क्लिक करा  










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या